- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: २०-२५ लाडवांसाठी
बेसनाचे लाडू रेसिपी
बेसनाचे लाडू हा एक अगदी सोपा व चविष्ट लाडवाचा प्रकार आहे. ह्या साठी तुम्ही थोडे जाडसर बेसन (डाळीचे पीठ) किंवा अगदी बारीक दळलेले बेसन दोन्ही वापरू शकता. जर तुम्हाला लाडू खाताना किंचित भरड पीठ लागलेले आवडत असेल तर जाड बेसन वापरा पण जर मऊ लाडू आवडत असेल तर बारीक बेसन वापरा.
Ingredients
- बेसन (डाळीचे पीठ) - ४ कप
- तूप - १ & १/२ कप
- पिठीसाखर - ३ & १/४ कप
- वेलदोड्याची पूड - १ टीस्पून
- बदामाचे काप किंवा बेदाणे - ३०-३५
Instructions
- एका कढईत तूप व बेसन मिसळून घ्या.
- मध्यम आचेवर सतत हालवत बेसन खमंग भाजून घ्या. किंचित ब्राउन दिसायला लागल्यावर गॅस बंद करा.
- भाजलेले बेसन कोमट होऊ द्या.
- त्यात पिठीसाखर, व वेलदोड्याची पूड घालून मिसळून घ्या. व मग हाताने कणकेप्रमाणे मळत मळत मऊ करून घ्या.
- थोडे थोडे पीठ एका वेळेला घेऊन गोल लाडू वळून घ्या. वळतानाच प्रत्येक लाडवात एक बेदाणा किंवा बदामाचा काप बाहेरून दिसेल असा लावा.