
- Prep Time: १० minutes
- Cook Time: ४५ minutes
- Serving: ५ जणांसाठी
छोले रेसिपी
छोले ही उत्तर भारतातील प्रसिद्ध व तशीच सर्वात आवडीची रेसिपी आहे. घरी बनवायला ही अगदी सोपी आहे आणि बहुतेक करून पुरी किंवा भटूऱ्यांबरोबर वाढली जाते पण पोळी / फुलका किंवा भाताबरोबर ही तुम्ही वाढू शकता.
Ingredients
- छोले - १ & १/२ कप
- कसूरी मेथी - १ टीस्पून
- कांदा - १
- टोमॅटो - १
- आलं - १ इंच मोठा तुकडा
- लसूण - ४ मोठ्या पाकळ्या (अंदाजे १ टेबलस्पून)
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
- छोले मसाला / गरम मसाला - ३ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
Instructions
- छोले ५-६ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. (जर जास्त वेळ नसेल तर कडकडीत गरम पाण्यात तासभर जरी भिजवून व झाकून ठेवलेत तरी चालेल किंवा कॅन मधले छोले वापरले तरी चालेल- ते भिजलेलेच असतात.)
- भिजवलेल्या छोल्यांमधे कसूरी मेथी घालून छोले प्रेशर कुकर मधे तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा व मग गॅस बारीक करून अर्धा तास ठेऊन मग गॅस बंद करा.
- आता एका चमच्याच्या मागील बाजूने थोडे छोले मॅश करून घ्या. (ह्यामुळे छोल्यांचा रस दाट व्हायला मदत होईल.
ग्रेव्ही साठी : कांदा, टोमॅटो, आलं, व लसूण एकत्र करून मिक्सर मधे बारीक वाटून ग्रेव्ही तयार करून घ्या.
पुढील कृति:
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात वर तयार केलेली ग्रेव्ही घाला.
- त्यात छोले मसाला किंवा गरम मसाला घालून ग्रेव्ही ब्राउन दिसेपर्यंत व कडेने तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्या.
- त्यात शिजविलेले छोले घाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व एकदा मिसळून घ्या.
- चवीप्रमाणे मीठ घाला व उकळी आल्यावर गॅस बंद करा.
- गरम गरम छोले पोळी किंवा भाताबरोबर वाढा. वाढताना त्याबरोबर कच्चा कांदा व लिंबाची एक चकती ही द्या.