
भेंडीची भाजी रेसिपी
भेंडीची ही परतून केलेली भाजी अगदी सोपी व कमीत कमी मसाले घालून बनविलेली पण तरीही चविष्ट रेसिपी आहे. भेंडीची भाजी चिकट व तार असलेली बनली तर ती छान लागत नाही. चिकट न होता ही भेंडीची भाजी कशी बनवायची त्याच्या काही टिप्स मी ह्या रेसिपीत दिल्या आहेत. आशा करते तुम्हाला रेसिपी आवडेल. 🙂
Ingredients
- भेंडी - १५-२० (अंदाजे पाव किलो)
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २ उभ्या चिरलेल्या
- मीठ - स्वादानुसार
- साखर - १/२ टीस्पून
Instructions
- भेंडी स्वच्छ धुऊन फडक्यांनी पुसून कोरडी करून घ्या.
- आपल्या आवडीनुसार भेंडीचे छोटे किंवा मोठ्या आकाराचे काप करून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद व मिरच्या घाला.
- मग चिरलेली भेंडी घालून सगळं हालवून घ्या. आता गॅस बारीक ते मध्यम आचेवर ठेऊन भेंडी गडद रंगाची व मऊ होईपर्यंत परतून घ्या. अगदी सारखे हालवू नका पण दर ३-४ मिनिटांनी एकदा हालवा.
- भेंडी पूर्ण शिजल्यावर त्यात मीठ, व साखर घालून सर्व मिसळून घ्या व एखादाच मिनिट (साखर विरघळेपर्यंत) ठेऊन लगेच गॅस बंद करून टाका.
- वरून आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व भेंडीची परतून केलेली ही चविष्ट भाजी पोळीबरोबर वाढा.