- Prep Time: 5 minutes
- Cook Time: 20 minutes
वडा पाव ची चटणी रेसिपी
वडा-पाव बरोबर नेहमी दिली जाणारी ही तिखट लसणाची चटणी बटाटे वड्यांबरोबर तळताना पडलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या कुरकुरीत तुकड्यांपासून बनविली जाते. पण ही एरवी सुद्धा खायला चविष्ट लागते. त्यामुळे मुद्दामून पीठ भिजवून सुद्धा ही चटणी तयार करता येते. ही चटणीअतिशय झणझणीत असते पण तिखटाचं प्रमाण कमी/जास्त करून ही तुम्हाला रुचेल एवढीच तिखट ठेवता येईल.
Ingredients
- पिठासाठी:
- डाळीचे पीठ किंवा बेसन (बारीक दळलेलं) - १ टेबलस्पून
- भरड दळलेलं जाड बेसन किंवा तांदुळाची पिठी - १ टीस्पून
- खायचा सोडा - एक चिमूटभर
- मीठ - चवीप्रमाणे
- तेल - तळण्यासाठी
- चटणीसाठी :
- लसणाची पाकळी - १
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - २ टीस्पून
Instructions
- १ टेबलस्पून बारीक बेसन व १ टीस्पून जाड बेसन किंवा तांदुळाची पिठी, मीठ, व खायचा सोडा मिसळून घ्या.
- हळू हळू पाणी घालत दाटसर पीठ भिजवून घ्या.
- तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
- हातानेच पिठाचे छोटे छोटे थेंब गरम तेलात टाका व किंचित गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- ह्याची साधारण ३-४ टेबलस्पून छोटी छोटी भाजी बनतील.
- लसूण, तिखट, व मीठ एकदा मिक्सर मधून बारीक करून घ्या व त्यातच वर तळलेली छोटी छोटी कुरकुरीत भजी घालून भरड असे वाटून चटणी तयार करून घ्या.
- ही झणझणीत चटणी बटाटे वडे किंवा वडा पाव बरोबर किंवा एरवी सुद्धा जेवणा बरोबर खायला खूपच छान लागेल. ह्याचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी ही एका हवा-बंद डब्यात भरून ठेवा.
- ही वडा पाव ची चटणी खूप झणझणीत असते पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी/जास्त तिखट घालून तुम्ही ही बनवू शकता.