- Prep Time: 30 minutes
- Cook Time: 5 minutes
वडा पाव रेसिपी
वडा पाव हे महाराष्ट्रातील विशेषतः पुणे मुंबई कडील एक प्रसिद्ध व खमंग स्नॅक आहे. ह्या साठी लागणारे बटाटे वडे कसे बनवायचे ते मी पुढील लिंक वर दिले आहेत - बटाटे वडे
ह्या साठी लागणारे तिखट लसणाची चटणी कशी बनवायची हे पुढील लिंक वर आहे - लसणाची तिखट चटणी
वडे व चटणी तयार झाल्यावर ते पण मधे भरून त्याचा वडा-पाव कसा बनवायचा ते खाली दिले आहे.
Ingredients
- बटाटे वडे - लागतील तसे
- पाव - लागतील तसे
- चिंचेची गोड चटणी - आवडीनुसार
- लसणाची तिखट चटणी - आवडीनुसार
Instructions
- बटाटे वडे तयार करून घ्या.
- पाव मधून अडवा कापून दोन भाग करून घ्या.
- तवा गरम करून त्यावर दोन्ही भाग ठेऊन किंचित ब्राऊन दिसेपर्यंत भाजून घ्या.
- एका भागावर चिंचेची गोड चटणी लावा व दुसऱ्या भागावर तिखट लसणाची चटणी लावा.
- एका भागावर एक किंवा दोन वडे (पावावर मावतील एवढे) ठेवा व पावाच्या दुसऱ्या भागाने झाकून थोडा दाबा व गरम गरम वडा-पाव लगेच खायला द्या.