- Prep Time: 20 minutes
- Cook Time: 45 minutes
- Serving: ४ कप शंकरपाळी
शंकरपाळी (गोडाची) रेसिपी
शंकरपाळी गोडाची किंवा खारी दोन्ही चहाबरोबर खायला खूप छान लागतात. इथे मी गोडाच्या शंकरपाळ्यांची रेसिपी सांगितली आहे. ह्या शंकरपाळ्या अतिशय खुसखुशीत बनतात. इथे मी जाड व मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या बनविल्या आहेत कारण त्या लवकर बनविता येतात पण तुम्ही हीच रेसिपी वापरून लहान आकाराच्या व पातळ शंकरपाळ्या ही बनवू शकता. दिवाळीत बनविला जाणारा हा एक फराळातील पदार्थ आहेच पण एरवी चहाबरोबर स्नॅक्स सारखा खायला ही खूप छान लागतो.
Ingredients
- दूध - १/२ कप
- साखर - ३/४ कप
- तूप - १/२ कप
- डाळीचं पीठ (बेसन) - १ टेबलस्पून
- रवा - २ टीस्पून
- सोडियम बायकार्बनेट (खायचा सोडा) - एक चिमूट
- मैदा - अंदाजे २ & १/२ कप
- तेल - तळण्यासाठी
Instructions
- दूध, साखर, आणि तूप एका पातेल्यात मिसळून उकळून घ्या.
- कोमट झाल्यावर त्यात बेसन, रवा, सोडा व मावेल इतका मैदा (साधारण २ & १/२ कप) घालून पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे थोडा घट्ट भिजवून घ्या.
- मैद्याचे साधारण दोन ते अडीच इंच मोठे गोळे करून हातानी गोल करून घ्या.
- एका वेळेला एक गोळा घेऊन त्याची १/२ से. मी. जाड पोळी लाटून घ्या.
- सुरीने किंवा कातण्याने एकसारखे चौकोनी काप कापून घ्या व पोळपाटावरून सोडवून घ्या.
- सर्व काप बारीक ते मध्यम आचेवर गरम तेलात गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- अश्याच पद्धतीने सगळ्या मैद्याच्या पोळ्या लाटून त्याच्या शंकरपाळ्या तेलात तळून घ्या.
- पूर्ण गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.