- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 10 minutes
- Serving: २ इंच मोठे ८ वडे
पोह्याचे वडे रेसिपी
पोह्याचे वडे म्हणजे अगदी झटपट करता येण्यासारखे व अतिशय सोपे आणि चविष्ट प्रकारचे वडे आहेत. ह्या वड्यांसाठी लागणारी सामग्री सुद्धा सहज घरी उपलब्ध असते. हे वडे चहा बरोबर खायला किंवा जेवणाबरोबर साईड डिश म्हणून खायला फार कुरकुरीत व खमंग लागतात.
Ingredients
- पोहे (मध्यम जाड) - १/२ कप
- डाळीचे पीठ किंवा बेसन (बारीक दळलेलं) - २ टेबलस्पून
- ताजे खवलेले खोबरे - २ टेबलस्पून
- आलं - १ इंच मोठा तुकडा, किसलेला
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - २
- कांदा - १/२ कांदा, बारीक चिरलेला
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
- जिरे - १/२ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
- हळद - १/४ टीस्पून
- तेल - १ टेबलस्पून पिठात घालण्यासाठी, व तळण्यासाठी वेगळे
Instructions
- एका रोळीत घालून पोहे वाहत्या पाण्याने धुऊन घ्या.
- पोह्यातील सगळे पाणी निथळण्यासाठी थोड्यावेळ बाजूला ठेऊन द्या.
- सगळे पाणी वाहून गेल्यावर भिजलेल्या पोहे एका तसराळ्यात काढून घेऊन, पोह्यांत बेसन, खोबरे, आलं, मिरच्या, कांदा व कोथिंबीर घाला.
- तसेच जिरे, मीठ, व हळद ही घाला.
- १ टेबलस्पून गरम करून तेल ही पोह्यात घाला.
- सगळं हाताने कालवून घ्या.
- वरील मिश्रणाचे साधारण २ इंच मोठे भाग करून ते हातावर गोल आणि चपटे करून वडे थापून घ्या.
- आता सर्व वडे गरम तेलावर सोनेरी रंगाचे दिसेपर्यंत तळून घ्या.
- तळून झाल्यावर एका पेपर टॉवेल वर काढा व गरम असतानाच एखाद्या चटणीबरोबर किंवा केचप बरोबर खायला द्या.