कैरीचा टक्कू रेसिपी
टक्कू म्हणजे कैरीचे झटपट, आंबट-गोड व मेथीचा स्वाद असलेले चविष्ट लोणचे. हे लोणचे अगदी झटपट तयार होते व फ्रीज मध्ये काही आठवड्यांपर्यंत छान टिकते. मात्र ह्यासाठी कैरी छान घट्ट व आंबट असायला हवी.
Ingredients
- किसलेली कैरी - १ कप
- मेथीचे दाणे - १/२ टीस्पून
- मोहरीची डाळ - १/२ टीस्पून
- मीठ - अंदाजे १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- लाल तिखट - १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- गूळ - १ टेबलस्पून
- तेल - १ & १/२ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/२ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
Instructions
- एका छोट्या कढईत २-३ थेंब तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे घाला.
- किंचित लालसर झाल्यावर गॅस बंद करा व गार होऊ द्या.
- त्यावर मोहरीची डाळ घालून सर्व एकत्र बारीक वाटून किंवा कुटून घ्या.
- ही पावडर किसलेल्या कैरीवर घाला.
- त्यावर मीठ (वर मिठाचे प्रमाण अंदाजे दिले आहे कैरीच्या आंबतपणाप्रमाणे कमी जास्त करू शकता; तसेच माठ व्यवस्थित प्रमाणात हवे म्हणजे टक्कू टिकायला ही मदत होईल), तिखट व गूळ ही घाला.
- गूळ विरघळेपर्यंत सर्व मिसळून घ्या.
- छोट्या कढईत १ & १/२ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करा व त्यात हिंग व हळद घाला.
- वरील फोडणी गार झाल्यावर ती कैरीच्या मिश्रणात घाला.
- तयार टकू फ्रीज मध्ये ठेवा. हा ३-४ आठवडे छान टिकेल.