- Prep Time: 5 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: २ ते २ & १/२ कप चटणी
चिंचगुळाची गोड चटणी रेसिपी
चिंचगुळाची आंबट गोड चटणी ही कितीतरी 'चाट' रेसिपीज साठी, जसे, भेळ, पाणी पुरी, आलू-टिक्की-चाट वगैरे, तसेच भजी, सामोसे ह्यासारख्या पदार्थांबरोबर ही सर्व्ह करायला उपयोगाला येते. ही घरी बनवायला अगदी सोपी आहे व फ्रीजमध्ये वर्षभर सुद्धा टिकू शकते.वाळलेल्या चिंचेच्या स्लॅब्स दुकानात सहज उपलब्ध असतात व तशीच एक स्लॅब तुम्हाला ह्या चटणीसाठी लागेल.
Ingredients
- वाळलेली चिंच - ३ x २ x १ इंच मोठा तुकडा ; अंदाजे १ कप
- गूळ - २ कप
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- धन्याची पूड - 2 टीस्पून
- जिऱ्याची पूड - 2 टीस्पून
Instructions
- वाळलेल्या चिंच अंदाजे दीड कप पाण्यात भिजत घाला. साधारण २-३ तासांनी चिंच मऊसर होईल. (चटणी लवकर हवी असल्यास चिंच गरम पाण्यात भिजत घाला.)
- भिजवलेली चिंच हाताने कोळून त्यातील सर्व चिंचोका काढून टाका.
- गूळ घालून मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्या.
- प्रेशर कुकर मध्ये ठेऊन एक शिट्टी येऊ द्या. एक शिट्टी आल्यावर गॅस बंद करून टाका.
- कुकर गार झाल्यावर चिंचगुळाचे मिश्रण बाहेर काढा व त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, धन्याची पूड व जिऱ्याची पूड घालून मिसळून घ्या.
- एका मोठ्या भोकांच्या गाळण्यातून गाळून घ्या म्हणजे चिंचेचा चोथा निघून जाईल.
- तयार चटणी एका काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाठलीत भरून फ्रीझ मध्ये ठेवा. फ्रीझ मध्ये ही चटणी वर्षभर सुद्धा टिकेल.
- वापरताना चटणीत गरजेप्रमाणे पाणी घालून हवी तशी पातळ करून वापरावी.