- Serving: ५ कप कोकम सरबत concentrate साठी
कोकम सरबत रेसिपी
कडक उन्हाळ्यात गार गार कोकम सरबत लगेच उत्साह देणारे एक सुंदर पेय आहे. ह्याचा concentrate जूस घरी बनवायला अगदी सोपा आहे व तो तयार करून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलात तर सबंध उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही ह्याचे सरबत हवे तेंव्हा लगेच तयार करून सर्व्ह करू शकता. ह्या रेसिपीसाठी मी वाळवलेले व बिया काढलेले कोकम म्हणजेच आमसूल वापरले आहे. तसेच ह्या रेसिपीसाठी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा - आमसुलं चांगली आंबट असायला हवी! मगच त्यात दुप्पट साखर मावेल व ही साखर प्रिझर्व्हेटिव्हचे काम सुद्धा करेल. भरपूर साखरेमुळे खरंतर हे room-temperature वर सुद्धा चांगले राहू शकते पण शंका नको म्हणून मी ते फ्रीजमध्येच ठेवते. आणि मग हवे तेंव्हा त्याचे थंडगार सरबत तयार करून सर्व्ह करते.
Ingredients
- वाळवलेली आमसुलं (बिया काढलेली) - १ कप
- साखर - २ कप
- काला नमक (सैंधव मीठ) - एक चिमूटभर एका ग्लासासाठी; सर्व्ह करताना
- जिऱ्याची पूड - एक चिमूटभर एका ग्लासासाठी; सर्व्ह करताना
Instructions
- १ कप आमसुलं २ & १/४ कप पाण्यात २-३ तासांसाठी भिजवून ठेवा.
- २-३ तासांनंतर भिजवलेल्या पाण्यासकट सगळी आमसुलं मिक्सर मधून वाटून जूस तयार करून घ्या.
- हा जूस एका गाळण्यातून गाळून घ्या व थोड्यावेळ बाजूला ठेवा.
- एका पातेल्यात २ कप साखर घालून त्यात १ कप पाणी घाला व त्याचा एकतारी पाक करून घ्या. (एकतारी पाकासाठी आधी साखर व पाण्याचे मिश्रण हालवून गॅसवर ठेवा व उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर १-२ मिनिटे तसेच उकळत ठेवा व अंगठा व एका बोटाच्या मधे एक थेंब घेऊन ताणून पाहा. जर एक तयार तयार होत असेल तर एक तरी पाक तयार झाला असे समजावे व गॅस बंद करून टाकावा.)
- पाक पूर्णपणे गार होऊ द्या.
- गार झाल्यावर कृतिक्रमांक ३ मधील कोकम जूस साखरेच्या पाकात घालून मिसळावा.
- तयार झालेले कोकम सरबताचे concentrate प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेऊन द्या.
- सर्व्ह करताना एक ग्लास थंड पाण्यात २-३ टेबलस्पून कोकम concentrate घालून मिसळून घ्या व त्यातच चिमूटभर काला नमक व चिमूटभर जिऱ्याची पूड घाला.
- परत एकदा सर्व हालवून त्यात बर्फ घाला व हे चविष्ट सरबत लगेच सर्व्ह करा.