Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About

तिळगुळाचे कडक लाडू रेसिपी

तिळगुळाचे कडक लाडू रेसिपी
  • Serving: २०-२५ लाडवांसाठी
Print

तिळगुळाचे कडक लाडू रेसिपी

By Uma Abhyankar जानेवारी 15, 2020

संक्रांतीला तिळगुळाचे अनेक प्रकार बनविले जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे तिळगुळाचे कडक लाडू. हे लाडू कडक जरी असले तरी खायला अतिशय खमंग व कुरकुरीत लागतात. शिवाय पटकन बनविता येतात. मात्र गरम असतानाच हे लाडू पटापट वळावे लागतात नाहीतर गार झाले तर वळता येत नाहीत. ह्या कारणासाठी एका वेळेला भराभर वळता येतील इतक्याच लाडवांचे प्रमाण एकावेळी घ्यावे.

Ingredients

  • तीळ - १ कप
  • गूळ - ३/४ (पाऊण) कप
  • शेंगदाणे - १/४ कप
  • किसलेले सुके खोबरे - १/४ कप
  • तूप - १ टेबलस्पून व आणखीन थोडेसे, वळताना हाताला लावायला
  • वेलदोड्याची पूड (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे १/४-१/२ टीस्पून

Instructions

  1. एका कढईत तीळ खमंग भाजून घ्यावेत. एकसारखे गुलाबी दिसायला लागल्यावर कढईतून काढून घ्यावेत.
  2. शेंगदाणे ही बाहेरून काळपट डाग दिसेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावेत व बाजूला काढावेत.
  3. किसलेले खोबरे ही गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून, बाजूला काढून घ्यावे.
  4. त्याच कढईत गूळ घालून, गॅस बारीक ठेऊन, गूळ विरघळू द्यावा.
  5. एकदा सगळा गूळ विरघळला की गॅस जरा मोठा करावा. एखाद्या मिनिटात गुळाला कडेने फेस सुटायला लागेल.
  6. गूळ तसाच पुढे २ मिनिटे उकळत ठेवावा.
  7. मग गुळाचा एक थेंब थोड्या पाण्यात घालून त्याची कुरकुरीत गोळी होते का हे तपासून पाहावे. पाण्यात टाकल्यावर गोळी चिवट नसून कुरकुरीत व्हायला हवी. बोटाने तुकडा मोडता यायला हवा.
  8. तसे झाल्यावर गॅस बंद करून टाकावा व त्यात तीळ, दाणे, खोबरे, व तूप घालून सर्व मिसळावे. आवडत असल्यास थोडी वेलदोड्याची पूड घालावी.
  9. व कढई खाली उतरवून, हाताला थोडेसे तूप लाऊन, हे मिश्रण गरम असतानाच छोटे छोटे लाडू वळावेत.
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

View Recipe

दिंड रेसिपी

30 min
kadbu
View Recipe

कडबू रेसिपी

30 min
पाकतल्या पुऱ्या रेसिपी
View Recipe

पाकतल्या पुऱ्या

30 min

Post navigation

← भरली वांगी रेसिपी
बुंदीचे लाडू रेसिपी →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.