आलू मेथी भाजी – मेथी व बटाटा भाजी – पंजाबी स्टाइल रेसिपी
आलू मेथी म्हणजे बटाटा व मेथीची ही भाजी एक नॉर्थ इंडियन किंवा पंजाबी स्टाइल भाजीची रेसिपी आहे. माझ्या मुलांना ही भाजी खूपच आवडते कारण ही अतिशय चटपटीत चवीची आहे शिवाय कोरडी असल्यामुळे डब्यात न्यायला ही सोईची आहे. तसेच बटाट्याची बरोबर पौष्टिक मेथी ही पोटात जाते! 🙂 ह्या रेसिपीत मी पंजाबी sabzi masala वापरला आहे. पण त्या ऐवजी तुम्ही चाट मसाला आणि आमचूर ही वापरू शकता.
Ingredients
- बटाटे - २ मध्यम आकाराचे
- मेथीची स्वच्छ धुतलेली पानं - २ कप
- तेल - ३ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- लसूण - १ टेबलस्पून बारीक चिरलेला
- Sabzi masala किंवा चाट मसाला व आमचूर - Sabzi masala १ & १/२ टीस्पून किंवा १ टीस्पून चाट मसाला व १/२ टीस्पून आमचूर
- लाल तिखट - १/२ टीस्पून
Instructions
- बटाट्यांची सालं काढून चौकोनी तुकडे करून घ्या.
- मेथीची पानं बारीक चिरून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग व हळद घाला.
- त्यावर लसूण घाला व लसूण किंचित ब्राउन दिसेपर्यंत परतून घ्या.
- आता चिरलेले बटाटे ही घाला व बटाट्याच्या फोडी किंचित ब्राउन दिसेपर्यंत मधे मधे हालवत ४-५ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.
- आता झाकण ठेऊन बटाटे शिजवून जवळ जवळ पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
- आता मेथी घाला.
- त्यावर मीठ, sabzi masala (किंवा चाट मसाला व आमचूर) व लाल तिखट घाला.
- झाकण ठेऊन बटाटा पूर्ण शिजेपर्यंत बारीक गॅसवर शिजू द्या.
- मग गॅस बंद करा व गरम गरम आलू मेथी भाजी पोळी किंवा फुलक्याबरोबर वाढा.