- Prep Time: 30 minutes
- Cook Time: 60 minutes
- Serving: २० बाकरवड्या
बाकरवडी रेसिपी
बाकरवडी हे एक फारच चवदार, खमंग व कुरकुरीत स्नॅक आहे. दिवाळीच्या दिवसांत किंवा एरवी पण चहा बरोबर खायला ही फारच चविष्ट लागते. ह्या वडीचं बाहेरचं कवच मैद्याचं असून आतील फिलिंग विशेष प्रकारचं व अतिशय चविष्ट असतं.
Ingredients
- बाहेरच्या कव्हर साठी :
- मैदा - १ कप
- तेल - २ टेबलस्पून
- मीठ - १/२ टीस्पून
- फिलिंगसाठी:
- किसलेले खोबरे - १/२ कप
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
- भाजलेले तीळ - २ टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या - ३ छोट्या, बारीक ठेचलेल्या
- लाल तिखट - १ टीस्पून
- धन्याची पूड - १ टेबलस्पून
- जिऱ्याची पूड - १/२ टेबलस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- साखर - ३ टीस्पून
- चिंचेचा कोळ (रेडिमेड कॉन्सनट्रेट किंवा चिंच भिजवून केलेला ताजा पण दाट कोळ) - कॉन्सनट्रेट असेल तर १/४ टीस्पून, ताजा असेल तर १/२ टीस्पून
- मध्यम जाड शेव - ३/४ कप
- तळण्यासाठी :
- तेल - आवश्यकतेनुसार
Instructions
कव्हर साठी:
- मैद्यामध्ये २ टेबलस्पून गरम तेल व मीठ घालून पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे घट्टसर भिजवून घ्या.
- १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
- प्रत्येक भागाची पोळी पोळपाटावर लाटता येईल इतके मोठे मैद्याचे एकसारखे भाग करून घ्या.
फिलिंग साठी :
- एक तसराळ्यात खोबरे, तीळ, कोथिंबीर, मिरच्या, तिखट, मीठ, साखर, चिंचेचा कोळ, धन्याची पूड, व जिऱ्याची पूड एकत्र करून घ्या.
- वरील मिश्रण मिक्सर मध्ये एकदोनदा फिरवून थोडे वाटून घ्या.
- त्यात शेव घालून सगळे परत एकसारखे करून घ्या.
- फिलिंगचे ही मैद्याइतकेच भाग करून घ्या. .
पुढील कृति :
- तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या.
- मैद्याचा प्रत्येक भाग हातांमध्ये फिरवून गोल व चपटा करून घ्या.
- ह्यातील एक हाग घेऊन त्याची पुरी इतकी जाडसर पोळी लाटून घ्या.
- बोटं पाण्यात बुडवून पोळीवर सगळीकडे थोडेसे पाणी लावून घ्या.
- त्यावर फिलिंगचा एक भाग पसारा. पोळीची साधारण १/२ से. मी. कड रिकामीच ठेवा.
- हातानी फिलिंग चांगले दाबून घ्या व पोळी घट्ट गुंडाळून घ्या. गुंडालेच्या कडा बंद करून टाका.
- गुंडाळीचे साधारण १ इंच मोठे काप करून घ्या.
- असेच प्रत्येक मैद्याच्या व फिलिंगच्या भागासाठी कृतिक्रमांक ३ ते ७ पर्यंत पुन्हा करून बाकरवाड्या कापून घ्या. आता बॅचेस मध्ये बाकरवड्यांचे काप गरम तेलात बारीक ते मध्यम आचेवर सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या.
- खमंग कुरकुरीत बाकरवाड्या पूर्ण गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.