- Serving: १० लाडवांसाठी
बुंदीचे लाडू रेसिपी
बुंदीचे लाडू हे कोणत्याही सणाला किंवा कार्यक्रमाला नेहमी बनविले जाणारे चवदार पक्वान्न आहे. खरं तर हे घरी बनवायला सोपे आहेत पण बुंदी बनविण्याचे काम जरा किचकट असल्याने बऱ्याचदा घरी ब बनविता हे आपण दुकानातून विकतच आणतो. तुम्ही जर बुंदी पाडायचे काम व लाडू बनवायचे काम दोन दिवसांमध्ये विभागून घेतले तर मात्र हे लाडू बनविणे फार सोपे आहे. त्यासाठी बुंदी आधीच बनवून एका हवाबंद डब्यात भरून ठेवलीत तर मग त्याचे लाडू कधीही लगेच बनविता येतील.
Ingredients
- बुंदी साठी :
- डाळीचं पीठ (बेसन) - १ & १/४ कप
- तेल किंवा तूप - १ टेबलस्पून पिठासाठी व तळण्यासाठी आणखीन
- मीठ (ऐच्छिक) - एक चिमूटभर
- लाडवासाठी :
- साखर - १ कप
- वेलदोड्याची पूड (ऐच्छिक) - आपल्या आवडीनुसार
- बदामाचे काप किंवा बेदाणे (ऐच्छिक) - आपल्या आवडीनुसार
- बुंदी - १ कप बेसनाच्या
Instructions
- डाळीच्या पिठात १ टेबलस्पून घरं तेल घाला.
- आवडत असेल तर किंचित मीठ ही घाला.
- आता हळू हळू पाणी घालत आधी घट्टसर पीठ भिजवून घ्या. पिठाचे गोळे होऊ देऊ नका.
- आता आणखीन अंदाजे पाऊण कप पाणी घालून पातळसर पीठ तयार करून घ्या.
- एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
- व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बंदीचा झारा तेलावर ३-४ इंच वर धरून त्यावर पीठ ओतून पसरा.
- पीठ आपोआप झाऱ्यातून तेलात पडले पाहिजे. जर पडत नसेल तर १-२ टेबलस्पून पाणी घालून थोडे पातळ करून घ्या व मग झाऱ्यावर घाला. झारा थोडासा वर खाली हालवून बुंदी तेलात पाडून घ्या.
- पीठ तेलात पडायचे थांबल्यावर झारा बाजूला करून झाऱ्यावर राहिलेले पीठ परत उरलेल्या पिठात घाला व झारा पाण्याने धुऊन व कागदाने किंवा फडक्याने कोरडा करून घ्या, व पुढील बॅच साठी तयार ठेवा.
- सतत हालवत बुंदी किंचित गुलाबीसर दिसेपर्यंत तळून घ्या.
- बुंदी जर गोल गोल न पडता लांबट पडत असतील तर पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून परत पाडून बघा. एकदा पीठ योग्य प्रमाणात पातळ झाले की बुंदी बरोबर गोल गोल पडतील.
- आता सगळ्या पिठाचा बुंदी तयार करून घ्या.
- एका कढईत, साखरेत १/२ कप पाणी घालून उकळायला ठेवा.
- सतत हालवत उकळी आली की तसेच २ मिनिटे उकळू द्या.
- बोटांच्या मध्ये एक थेंब घेऊन ताणून पहा की एक तार बनते का. जर नसेल तर अजून एखादा मिनिट उकळू द्या व परत पडताळून पहा. एक तयार दिसायला लागल्यावर गॅस बंद करून टाका.
- आता तयार बुंदी पाकात घाला व सर्व मिसळून घ्या. आवडत असेल तर वेलदोड्याची पूड, बदामाचे काप किंवा बेदाणे ही घाला व हे मिश्रण अंदाजे अर्धा पाऊण तास किंवा सगळा पाक जवळ जवळ दिसेनासा होईपर्यंत तसेच ठेवा. दार १०-१२ मिनिटांनी हलवायला विसरून नका.
- एकदा बुंदी पाकात पूर्ण मुरल्या की लाडू वळायला सुरवात करा.
- दोन्ही हातांनी थोडे थोडे मिश्रण दाबात दाबत गोल गोल लाडू वळून घ्या.