- Serving: १०-१२ पराठयांसाठी
गाजराचा पराठा रेसिपी
गाजराचा हा पराठा किंवा परोठा हा पराठ्याचा एक वेगळा पण अतिशय चविष्ट व पौष्टिक प्रकार आहे. जरूर करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.
Ingredients
- गाजरं - १ & १/२ किलो किसलेली
- तेल - ४ टीस्पून फिलिंग साठी व पराठा तावयावर भाजताना आणखीन थोडे
- मोहरी - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ -१ /२ टीस्पून
- डाळीचं पीठ (बेसन) - ५ टेबलस्पून
- कव्हर साठी :
- गव्हाचं पीठ (कणीक) - २ कप
- मीठ - १/२ टीस्पून
- तेल - २ टीस्पून
Instructions
- फिलिंग साठी : गाजर स्वच्छ धुऊन सालं व देठं काढून किसून घ्या.
- एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, व हळद घाला.त्यावर किसलेली गाजरं घाला.
- सगळं मिसळून त्यात मीठ व तिखट घाला.
- परत सर्व हालवून झाकण ठेवा व गाजरं मऊ होईपर्यंत, मधे मधे हालवत ८-१० मिनिटे शिजवून घ्या.
- आता डाळीचं पीठ घालून सर्व मिसळून घ्या.
- गॅस अगदी बारीक करून २-३ मिनिटे परत झाकण ठेऊन शिजवून घ्या.
- आता गॅस बंद करा व हे फिलिंग गार होण्यासाठी ठेऊन द्या.
पराठ्याच्या कव्हर साठी :
- कणकेमध्ये १/२ टीस्पून मीठ, २ टीस्पून तेल घालून हळू हळू पाणी घालत पोळीच्या कणकेप्रमाणे थोडी मऊसर कणीक भिजवून घ्या.
- भिजविलेली कणीक झाकून १५ मिनिटे मुरायला ठेवा.
पुढील कृति :
- कणकेचा अंदाजे २" गोळा घेऊन साधारण तेवढाच मोठा फिलिंगचा गोळा त्यात भरा व वरून दाबून बंद करून घ्या.
- हाताने दाबून थोडा चपटा करून घ्या व लाटण्याने गोलसर लाटून घ्या. खूप पातळ न करता साधारण १/२ से.मी. जाड ठेवा.
- लाटताना वाटल्यास थोडी थोडी कोरडी कणीक लावायला हरकत नाही.
- तव्यावर टाकून दोन्ही बाजूंना थोडे थोडे तेल सोडून पराठा खमंग भाजून घ्या.
- असेच सर्व पराठे तयार करून घ्या व लोण्याबरोबर आणि एखाद्या लोणच्याबरोबर गरम गरम वाढा.
Wonderful Web page, Continue the great work. With thanks!