- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 15 minutes
लसणाची चटणी रेसिपी
लसणाची ही चटणी अतिशय खमंग अशी कोरडी चटणी आहे जी रोजच्या जेवणात तोंडीलावणे म्हणून खायला खूपच छान लागते. लसूण हा औषधी आहेच तेंव्हा थंडीच्या दिवसांत ही चटणी रोज खायला तब्येतीला ही फायदेशीर आहे.
Ingredients
- लसणाच्या मोठ्या पाकळ्या - १०-१२
- लाल तिखट - ३ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- दाण्याचे कूट - ६ टेबलस्पून
- किसलेले सुके खोबरे - १ कप
- साखर - १/२ टीस्पून
Instructions
- एका मिक्सरच्या जार मधे लसूण, तिखट, साखर व मीठ घालून बारीक पेस्ट करून घ्या.
- खोबरे भाजून घेऊन ते ही वरील मिक्सरच्या भांड्यात घाला.
- सगळे थोडा भरडसर वाटून घ्या.
- त्यात दाण्याचे कूट घालून परत एकदा हलकेच फिरवून घ्या.
- ही चविष्ट कोरडी चटणी एका हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे वास जाणार नाही.
- रोजच्या जेवणात ही खमंग लसणाची चटणी जरूर वाढा.