- Serving: अंदाजे ५ दाबेल्यांसाठी
कच्छी दाबेली रेसिपी
कच्छी दाबेली हा भारतातील कच्छ भागातील एक चविष्ट स्नॅक चा प्रकार आहे. ह्या रेसिपीत पावाच्या मध्ये बटाट्याचा एक तिखट व वैशिष्ट्यपूर्ण मसाला भरला जातो. कच्छी दाबेली हा 'स्ट्रीट फूड' चाच एक प्रकार म्हणता येईल जो बनवायला अगदी सोपा आहे व ह्यासाठी लागणारे सगळे पदार्थ बहुतेक घरी सहज उपलब्ध असतात.
Ingredients
- बटाटे - ४ मध्यम आकाराचे उकडून सालं काढलेले
- कांदा - १ बारीक चिरलेला
- आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - १ टेबलस्पून
- लसणाची पेस्ट - १ टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - २ किंवा चवीनुसार
- धन्याची पूड - १ टीस्पून
- गरम मसाला - १ टीस्पून
- आमचूर - १ टीस्पून
- मिऱ्याची पूड - १/२ टीस्पून
- काळा / गोडा मसाला - १/२ टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- डाळिंबाचे दाणे - १/२ कप
- पाव - अंदाजे ५
- चिंचगुळाची गोडसर चटणी - आवश्यकतेनुसार
Instructions
- उकडलेले बटाटे हाताने अर्धवट कुस्करून घ्या. पूर्ण मॅश करू नका.
- त्यात कांदा, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, व मिरच्या घाला.
- त्यातच धन्याची पूड, गरम मसाला, आमचूर, मिऱ्याची पूड, काळा मसाला व मीठ घाला.
- सगळं एकत्र मिसळून फिलिंग तयार करून घ्या.
- वरील प्रमाणासाठी तुम्हाला अंदाजे ५ पाव लागतील. प्रत्येक पाव मध्ये अर्धा कापून दोन्ही बाजूला गोड चटणी लाऊन घ्या.
- त्यावर आवडीप्रमाणे वरील फिलिंग भरून घ्या व थोडे डाळिंबाचे दाणे ही फिलिंगवर पसरा. पावाचा दुसरा अर्धा भाग त्यावर ठेऊन दाबेली तयार करून घ्या.
- अश्या प्रकारे सर्व दाबेल्या बनवून घ्या.
- सर्व्ह करताना प्रत्येक दाबेली तव्यावर दोन्ही बाजूने भाजून जरा गरम करून घ्या व सर्व्ह करा. भाजून घेताना थोडे थोडे लोणी लाऊन भाजले तरी चालेल.