- Serving: ६ जणांसाठी
एगलेस टोमॅटो ऑमलेट रेसिपी
एगलेस टोमॅटो ऑमलेट ही एक अगदी झटपट रेसिपी आहे जी तुम्ही केंव्हाही झटपट बनवून लगेच खाऊ शकता. ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स म्हणून खायला ही एक खूप छान रेसिपी आहे. हे बिन अंड्याचे ऑमलेट तुम्ही एखाद्या हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसत्या केचप बरोबर ही वाढू शकता.
Ingredients
- डाळीचं पीठ (बेसन) - ३ कप
- तांदुळाची पिठी - ३/४ कप
- आलं - १ टेबलस्पून किसलेलं
- हिरव्या मिरच्या - ३-४ किंवा चवीप्रमाणे, बारीक ठेचलेल्या
- तेल - २ टेबलस्पून पिठात घालायला व आणखीन थोडे तव्यावर घालायला
- मीठ - चवीप्रमाणे
- हळद - १/२ टीस्पून
- कांदा - २ छोटे, बारीक चिरलेले
- टोमॅटो - ३ मोठे बारीक चिरलेले
- कोथिंबीर - आवडीप्रमाणे, बारीक चिरलेली
Instructions
- एका तसराळ्यात डाळीचं पीठ, तांदुळाची पिठी, २ टेबलस्पून तेल, मीठ, हळद, किसलेलं आलं, कोथिंबीर व ठेचलेल्या मिरच्या सर्व एकत्र करून घ्या.
- हळू हळू पाणी घालत व गुठळ्या मोडत पातळसर पीठ तयार करून घ्या. (मी वर दिलेल्या प्रमाणासाठी ३ कप पाणी वापरले.)
- आता कांदा व टोमॅटो घालून सर्व हलवून घ्या.
- एक तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवा.
- तव्याच्या मध्ये थोडे तेल पसरून घ्या.
- त्यावर थोडे थोडे पीठ चमच्याने पसरून, गोलसर व अंदाजे १/२ से.मी. जाड असे ऑमलेट पसरून घ्या.
- झाकण ठेऊन १-२ मिनिटे शिजू द्या.
- वरची बाजू शिजलेली दिसायला लागली व कडेने किंचित ब्राऊन दिसायला लागल्यावर ऑमलेट उलटून टाका.
- दुसऱ्या बाजूला ही १-२ मिनिटात किंचित डाग आले कि तव्यावरून काढून घ्या.
- गरम गरम टोमॅटो ऑमलेट कोणत्याही आवडीच्या चटणीबरोबर किंवा केचप बरोबर वाढा.