- Serving: ७ इंच व्यासाच्या अंदाजे १६ पोळ्या
सांज्याची पोळी रेसिपी
सांज्याची पोळी ही गूळ आणि रव्याची एक खमंग गोड पोळी आहे. बेताची गोड व बनवायला अगदी सोपी अशी ही पोळी खायला फारच छान लागते. ह्यासाठी तुम्ही जाड किंवा बारीक रवा वापरू शकता. बारीक रवा वापरल्यास सारणासाठी पाणी थोडेसे कमी लागेल. आशा करते तुम्हाला रेसिपी आवडेल.
Ingredients
- कव्हर साठी:
- गव्हाचे पीठ (आटा) - १ & १/४ कप
- मैदा - १/४ कप
- तेल - ४-५ टीस्पून
- मीठ - एक चिमूट
- सारणासाठी:
- रवा (बारीक किंवा जाड; मी जाड रवा वापरला आहे) - १ & १/४ कप
- तूप - २ टेबलस्पून
- गूळ - १ & ३/४ - २ कप
- जायफळ पावडर - १ टीस्पून
- वेलदोड्याची पूड - १ टीस्पून
- पोळी लाटताना
- तांदुळाची पिठी - अंदाजे ३-४ टेबलस्पून
Instructions
सारणासाठी :
- २ कप पाण्यामध्ये सगळा गूळ घालून सर्व एकदा हालेवून उकळायला ठेवा.
- गूळ-पाण्याचे मिश्रण उकळेपर्यंत एका कढईत तूप घालून त्यावर रवा थोडा ब्राउन दिसेपर्यंत भाजून घ्या.
- आता गॅस बारीक करून उकळलेल्या गूळ-पाण्याचे मिश्रण रव्यावर सावकाश ओता.
- सगळे पाणी रव्यात सोशल गेले कि झाकण ठेऊन ३-४ मिनिटे शिजू द्या. मध्ये एकदोनदा हालवायला विसरू नका.
- ३-४ मिनिटांनंतर गॅस बंद करा व हे सारण गार होऊ द्या.
- गार झाल्यावर त्यात जायफळ व वेलदोड्याची पूड घालून सारं हाताने छान मळून त्याचा कणकेप्रमाणे गोळा तयार करून घ्या.
- सारणाचे साधारण २ इंच मोठे गोळे करून थोड्यावेळ बाजूला ठेवा.
कव्हरसाठी :
- गव्हाचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ व २ टीस्पून तेल घाला.
- थोडे थोडे पाणी घालत पोळी प्रमाणे कणीक भिजवून घ्या.
- एका वाटीत १ टेबलस्पून तेल व १ टेबलस्पून पाणी असे मिश्रण तयार करून घ्या.
- हे मिश्रण थोडे थोडे कणकेला लावत परत एकदा सगळी कणीक चांगली मळून मऊसर करून घ्या व ही कणीक १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
- आता जेवढे सारणाचे भाग केलेत तितकेच कणकेचे ही एकसारखे भाग करून घ्या.
पुढील कृति :
- आता मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवा व एका
- Tightly wमऊसर सुती कापड घट्ट गुंडाळून घ्या. (व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे)
- आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा हाताने फिरवत व दाबत दाबत चपटा गोल करून घ्या.
- त्यात सारणाचा एक गोळा ठेवा व सगळीकडून कणीक वर आणत व सारण खाली दाबत दाबत कणकेचा उघडा भाग घट्ट बंद करून टाका.
- आता हा गोळाचपटा करून त्यावर दोन्ही बाजूला थोडी तांदुळाची पिठी लावा व पातळ पोळी लाटून घ्या.
- लाटताना गरज वाटल्यास थोडी आणखीन तांदुळाची पिठीही लावायला हरकत नाही पण कमीत कमी पिठी लावल्याने पोळी जास्त मऊसर होईल.
- लाटून झाल्यावर पोळी गरम झालेल्या तव्यावर घाला व दोन्ही बाजूंना थोडे थोडे डाग दिसेपर्यंत खमंग भाजून घ्या.
- भाजून झाल्यावर टाव्यावरून काढून घ्या व पातळ तूप पसरून गरम गरम खायला वाढा.
- उरलेल्या सारणाच्या व कणकेच्या ही अश्याच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घ्या.