- Serving: ३ कप मोळगा पोडी
मोळगा पोडी रेसिपी
एक अतिशय चविष्ट व करायला अगदी सोपी अशी कोरडी साउथ इंडियन चटणी म्हणजे मोळगा पोडी. इडली, डोसा, वडा इत्यादि पदार्थांबरोबर कोरडी किंवा थोडेसे तेल किंवा तूप घेऊन खायला ही फारच रुचकर लागते. ह्या रेसिपी मध्ये मी 'काश्मीरी लाल मिरच्या' वापरल्या आहेत व त्यामुळे चटणीला खूप छान रंग येतो. ह्या मिर्च्यांना तिखटपणा अजिबात नसल्यामुळे चटणी तिखट ही होत नाही. पारंपारिक पद्धतीमधे जरी ही चटणी झणझणीत असली तरी लाल मिरच्यांचे प्रमाण व प्रकार बदलून किंवा कमी/जास्त करून, तुम्ही चटणीचा तिखटपणा आपल्या आवडीप्रमाणे ठेऊ शकता.
Ingredients
- तेल - १ टीस्पून
- बारीक मोहरी - १/२ टीस्पून
- कढीलिंबाची पाने - ५-६
- वाळलेल्या लाल मिरच्या (काश्मीरी लाल मिरच्या) - १०
- उडदाची डाळ - १/२ कप
- हरभऱ्याची डाळ - १ कप
- तीळ - १/४ कप
- हिंग - १/४ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
Instructions
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व कढीलिंब घालून थोडेसे परतून घ्या व त्यातच लाल मिरच्या (छोटे छोटे तुकडे करून) ही घाला.
- दोन मिनिटे परतून गॅस बारीक करा व ही फोडणी दुसया पातेल्यात काढून घ्या.
- त्याच कढईत एक एक करून तीळ, हरभऱ्याची डाळ, व उडदाची डाळ ही किंचित ब्राउन दिसेपर्यंत भाजून घ्या. व भाजून झाल्यावर फोडणीच्याच पातेल्यात काढून एकत्र करा.
- भाजून एकत्र केलेले सर्व पदार्थ गार होऊ द्या व मग चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सर मध्ये किंचित भरड दळून घ्या.
- चविष्ट व आकर्षक मोळगा पोडी पूर्ण गार झाल्यावर हवा-बंद डब्यात भरून ठेवा.