- Serving: ५ जणांसाठी
राजमा रेसिपी
राजमा चावल ही उत्तर भारतातील पॉप्युलर डिश आहे. गरम गरम राजमा, प्लेन भाता बरोबर किंवा जीरा-राइस बरोबर तर छान लागतोच पण पोळी, फुलका, नान वगैरे इतर इंडियन ब्रेडच्या प्रकारांबरोबर सुद्धा खायला अतिशय पौष्टिक व चविष्ट लागतो. बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.
Ingredients
- राजमा - १ & १/२ कप
- कांदा - १, मोठा मोठा चिरलेला
- टोमॅटो - १, मोठा मोठा चिरलेला
- आलं - १ इंच मोठा तुकडा
- लसूण - ४-५ मोठ्या पाकळ्या
- तेल - ३ टेबलस्पून
- राजमा मसाला किंवा गरम मसाला - २ & १/२ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
Instructions
- कमीत कमी ५-६ तास राजमा भरपूर पाण्यात भिजत घाला. जर लवकर हवा असेल, तर उकळत्या पाण्यात भिजत घालून झाकण ठेवा,म्हणजे २ तासांत ही भिजेल.
- आता प्रेशर कुकर मधे तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करा व १/२ तासाने बंद करा.
- कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण मिक्सर मधे एकत्र वाटून प्यूरी तयार करून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील प्यूरी घाला.
- प्यूरी गडद रंगाची होईपर्यंत व कडेला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्या.
- मग त्यात शिजवून घेतलेला राजमा घाला.
- चवीप्रमाणे मीठ घाला व सर्व मिसळून उकळी येऊ द्या.
- गरम गरम राजमा, भाता बरोबर किंवा फुलक्याबरोबर वाढा.