उपासाची बटाट्याची भाजी रेसिपी
बटाट्याची ही भाजी अगदी सोपी रेसिपी आहे व उपासाला सुद्धा चालण्यासारखी आहे. शक्यतो ही भाजी वऱ्याचे तांदूळ आणि आमटी बरोबर वाढली जाते व उपासाच्या दिवशी फराळाबरोबर तोंडीलावणे म्हणून खायला खूप छान लागते.
Ingredients
- बटाटे - २, उकडून सालं काढलेले
- तेल / तूप - ३ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - १ किंवा २ किंवा चवीप्रमाणे, बारीक चिरलेल्या
- दाण्याचं कूट - १ टेबलस्पून
- मीठ - चवीनुसार
- साखर - १ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
Instructions
- उकडलेले बटाटे पूर्ण गार झाल्यावर त्याचे मोठे तुकडे करून घ्या.
- तेल गरम करून त्यात जिरे घाला व त्यातच मिरच्या ही घाला.
- थोडेसे परतून त्यावर बटाट्याच्या फोडी घाला.
- एकदा मिसळून घ्या व मग दाण्याचं कूट, मीठ, साखर घालून परत मिसळून घ्या.
- दोन मिनिटे ठेऊन गॅस बंद करून टाका.
- बटाट्याची ही चवदार भाजी उपासाच्या तांदूळ-आमटी बरोबर वाढा.