- Serving: १५ - २० ढोकळा पीसेस
ढोकळा – इडलीच्या पिठाचा रेसिपी
इडलीच्या पिठाची इडली करून जर कंटाळा आला असेल तर त्याच पिठापासून बनविलेला हा झटपट खमंग ढोकळा तुम्हाला खूप आवडेल. अगदी हलका-फुलका व रवाळ असा हा ढोकळा कोथिंबिरीच्या किंवा खोबऱ्याच्या, किंवा कोणत्याही साऊथ इंडियन चटणी बरोबर छान लागतो.
Ingredients
- इडलीचं पीठ - 2 cups
- डाळीचं पीठ (बेसन) - 2 tbsp
- किसलेलं आलं - १ & १/२ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २ बारीक ठेचलेल्या
- मीठ - चवीप्रमाणे
- सोडियम बायकार्बोनेट (खायचा सोडा) - १/२ टीस्पून
- तेल - १ & १/२ टीस्पून
- बारीक मोहरी - १ टीस्पून
- हिंग - 1/4 tsp
- तीळ - १ टीस्पून
- सायट्रिक ऍसिड - १/४ टीस्पून
- साखर - १ टीस्पून
Instructions
- इडलीच्या पिठात डाळीचं पीठ घालून मिसळून घ्या. डाळीच्या पिठाच्या गुठळ्या राहू देऊ नका.
- त्यातच आलं, मिरच्या, मीठ व सायट्रिक ऍसिड घालून मिसळून घ्या.
- त्यावर सोडा घालून सगळं चांगलं फेटून घ्या.
- आता सर्व पीठ एका तेल लावलेल्या भांड्यात घालून, दुसऱ्या एका तसराळ्यात पाणी घालून (वर व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे) त्यात वाफवायला ठेवा.
- १५ मिनिटांसाठी, वर झाकण ठेऊन वाफवायला ठेवा.
- ढोकळ्याला वाफ येईपर्यंत एका छोट्या कढईत १ & १/२ टीस्पून तेल घालून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व तीळ घाला.
- तीळ किंचित ब्राउन होईपर्यंत परतून घ्या व मग गॅस बंद करा.
- ही फोडणी पूर्ण गार व्हायला ठेऊन द्या.
- १५ मिनिटं वाफ आल्यावर ढोकल्याच्या पिठात एक टूथपिक घालून तपासून पहा.
- जर टूथ पिक कोरडी बाहेर आली तर गॅस बंद करा नाहीतर आणखीन थोड्यावेळ वाफवून घ्या.
- आता ढोकळ्याचं भांडं बाहेर काढून घ्या व पूर्ण गार होऊ द्या.
- गार झाल्यावर कडेने सोडवून घ्या व चौकोनी ढोकळा कापून घ्या.
- ढोकळा बाहेर काढून घ्या व त्यावर गार झालेली फोडणी थोडी थोडी पसरून घाला.
- खमंग इडलीचा ढोकळा कोथिंबिरीच्या किंवा एखाद्या साउथ इंडियन चटणीबरोबर खायला द्या.