- Serving: ४ परोठयांसाठी
मटार चा पराठा / परोठा रेसिपी
ब्रेकफास्ट साठी हिरव्या मटार चा हा पराठा एकदम सोपी रेसिपी आहे. ह्यासाठी तुम्ही ताजे मटार चे दाणे किंवा फ्रोझन मटार ही वापरू शकता. शिवाय पराठ्याचं सारण तुम्ही आधीपासून तयार करून दोन तीन दिवसांसाठी फ्रीज मधे ठेऊ शकता.
Ingredients
- कव्हर साठी -
- गव्हाचं पीठ - १ & १/२ कप + लाटताना लावायला अजून थोडे पीठ
- मीठ - १/२ टीस्पून
- तेल - १ टीस्पून + थोडे आणखीन पराठा भाजताना
- सारणासाठी -
- मटार - २ कप
- लसणाची पेस्ट - २ टीस्पून
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - चवीप्रमाणे
- मीठ - चवीप्रमाणे
- बडीशेपेची भरडसर पूड - १ टीस्पून
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
Instructions
कव्हर साठी : गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून मऊसर कणीक भिजवून घ्या.
सारणासाठी :
- मटार मिक्सर मधे किंचित भरड असे वाटून घ्या.
- तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लसणाची पेस्ट आणि बडीशेप घाला.
- लसूण थोडासा ब्राउन दिसायला लागल्यावर त्यात मटार घालून मिसळून घ्या.
- आता मीठ घालून परत मिसळा.
- मधे मधे हालवत पाच मिनिटे आणखीन परतून घ्या व मग गॅस बंद करा.
- आता सारण पूर्ण गार होऊ द्या.
:
- कणकेचा २ ते ३ इंच मोठा गोळा घेऊन त्याची हाताने वाटी करून घ्या.
- त्यात मावेल इतके सारण दाबून भरून घ्या व वाटी वरून बंद करून टाका.
- हाताने चपटा करून गोल आणि थोडा जाडसर असा परोठा लाटून घ्या.
- आता गरम तव्यावर टाकून परोठा दोन्ही कडून भाजून घ्या. भाजताना दोन्ही बाजूला थोडे थोडे तेल सोडून भाजून घ्या.
- असेच सगळ्या सारणाचे व कणकेचे परोठे तयार करून घ्या.
- गरम गरम मटार चा परोठा लोणी, दही व लोणच्याबरोबर वाढा.