- Serving: ४ जणांसाठी
हरभऱ्याची कोरडी उसळ रेसिपी
हरभऱ्याची ही कोरडी उसळ नवरात्रीच्या दिवसांत उत्तर भारता मध्ये ही हमखास बनवली जाते. ह्याला 'सूखा काला चना' असे हिंदीत म्हणतात व शक्यतो ही पुरी व शिऱ्याबरोबर दिली जाते. ह्यासारखीच कोरडी उसळ दक्षिण भारतात ही बनवितात पण त्याची रेसिपी वेगळी आहे. दोन्ही उसळींमधे कांदा लसूण नसतो व हरभरा शिजायचा व भिजवायचा वेळ काढला तर अगदी झटपट तयार होतात व स्नॅक्स म्हणून किंवा जेवणात पौष्टिक साइड डिश म्हणून खायला फार चविष्ट लागतात. आज इथे आपण उत्तर भारतातील प्रसिद्ध 'काला चना' ची रेसिपी इथे पाहणार आहोत.
Ingredients
- हरभरे - १ कप
- तेल - २ टेबलस्पून
- जिरे - १ टीस्पून
- वाळलेली लाल मिरची - २
- धन्याची पूड - २ टीस्पून
- जिऱ्याची पूड - २ टीस्पून
- लाल तिखट - स्वादानुसार
- मीठ - स्वादानुसार
Instructions
- हरभऱ्यामधे ३ कप पाणी घालून ४-५ तास भिजत घाला.
- मग तीन शिट्ट्या होईपर्यंत कुकर मध्ये शिजवून घ्या. तीन शिट्ट्या आल्यानंतर गॅस बारीक करा व आणखीन अर्धा तास शिजू द्या. गॅस बंद करा व कुकर गार झाल्यावर हरभरे बाहेर काढून घ्या.
- हभऱ्यावरील पाणी एका पातेल्यात वेगळे काढून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे व लाल मिरच्या घाला.
- गॅस बारीक करून त्यावरच धन्याची पूड, जिऱ्याची पूड, तिखट व मीठ घाला व अगदी थोडेसे परतून त्यावरच शिजविलेले हरभरे घाला.
- सगळं मिसळून, त्यावर बाजूला काढून ठेवलेलं हरभऱ्यावरचे पाणी, अंदाजे २-३ टेबलस्पून पसरून घाला.
- परत सगळे मिसळून २ मिनटे शिजू द्या व मग गॅस बंद करा.
- ही कोरडी हरभऱ्याची उसळ पुरी किंवा पोळीबरोबर वाढा.