- Prep Time: 5 minutes
- Cook Time: 10 minutes
कढी रेसिपी
खिचडी म्हंटलं की कढी तर हवीच! मग खिचडी मुगाची असो किंवा तुरीची. तसंच थंडीच्या दिवसांत कोणत्याही जेवणाबरोबर, अगदी नुसत्या साध्या भाताबरोबर सुद्धा गरमागरम कढी प्यायला खूप छान लागते. खरं तर कढी बनवायच्या बऱ्याच पद्धती आहे. उत्तर भारतात कढी जरा दाटसर असते. काही जणं कढीत बेसनाचे वडे ही घालतात व त्याला 'पकोडे वाली कढी' असे हिंदीत म्हणतात. दक्षिण भारतात कढी ही पांढऱ्या रंगाची असते, त्यात हळद घालत नाहीत. इथे मी महाराष्ट्रियन पद्धतीने कढी बनवायची रेसिपी दिली आहे.
Ingredients
- दही किंवा ताक - दही- १/२ कप किंवा ताक १ & १/२ कप
- बेसन (डाळीचं पीठ) - १ टेबलस्पून
- मीठ - स्वादानुसार
- साखर - १ & १/२ टीस्पून
- तेल - २ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- हिंग - १/८ टीस्पून
- हळद - १/८ टीस्पून
- हिरवी मिरची - १ किंवा स्वादानुसार
- कढीलिंब - ४-५ पाने
- किसलेलं आलं - १ टीस्पून
- मेथीचे दाणे - १/४ टीस्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर - वरून सजावटीसाठी
Instructions
- एका मिक्सर च्या भांड्यात दही, बेसन, मीठ, साखर व १ कप कोमट पाणी एकत्र करून घ्या. (दह्याच्या ऐवजी जर ताक वापरत असाल तर पाणी घालायची गरज नाही)
- मिक्सर फिरवून सर्व एकत्र ब्लेंड करून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, कढीलिंब, मेथीचे दाणे व आलं घालून थोडंसं परतून घ्या.
- त्यात मिक्सर मधे तयार करून ठेवलेले मिश्रण घाला.
- त्यातच आणखीन, अंदाजे १ & १/४ कप पाणी घालून पातळ करून घ्या. (आणखीन पाणी घातल्यावर मिठाची चव ऍडजस्ट करून घ्या.)
- आता बारीक ते मध्यम आचेवर ठेऊन, मधे मधे हालवत रहा व कढीला उकळी येऊ द्या.
- उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- गरमागरम कढी भाताबरोबर किंवा खिचडी बरोबर वाढा.