- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
ब्रेड पकोडा रेसिपी
ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड ची खमंग भजी! ताज्या किंवा शिळ्या ब्रेड ची ही भजी करायला अगदी सोपी आहेत, आणि चहा बरोबर खायला अतिशय चविष्ट आणि झटपट बनविता येतात. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे ह्याचा आकार तुम्ही लहान किंवा मोठा आपल्या आवडीप्रमाणे ठेऊ शकता.
Ingredients
- ब्रेड स्लाइस - ३
- बटाटे - २ किंवा ३ मध्यम आकाराचे; उकडून सालं काढलेले
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- डाळीचं पीठ (बेसन) - १ & १/२ कप
- तांदुळाची पिठी - १ & १/२ टेबलस्पून
- ओवा - १/२ टीस्पून
- खायचा सोडा किंवा सोडियम बायकार्बनेट - १/४ टीस्पून
- तेल - ब्रेड पकोडा तळण्यासाठी
- हळद (ऐच्छिक) - १/४ टीस्पून
Instructions
- प्रत्येक ब्रेड ची स्लाइस मधून तिरकी कापून ४ त्रिकोण करून घ्या.
- बटाट्यात तिखट, मीठ घालून मॅश करून व नीट मिसळून घ्या.
- बटाट्याचा एक पातळ थर (२-३ मिलीमीटर जाड) ब्रेडच्या प्रत्येक त्रिकोणाच्या एका बाजूवर पसरून घ्या.
- बेसन व तांदुळाची पिठी एकत्र करून घ्या व त्यात मीठ, हळद(ऐच्छिक), ओवा, आणि खायचा सोडा मिसळून घ्या.
- त्यात हळू हळू पाणी घालत थोडे दाटसर असे पीठ भिजवून घ्या. (अंदाजे १ कप पाणी लागेल)
- एका कढईत पकोडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
- तेल चांगले तापल्यावर, एकावेळी ब्रेड चा एक त्रिकोण पिठात घालून, दोन्ही बाजूला पीठ व्यवस्थित लागेल असा बुडवून, गरम तेलात सावकाश सोडा. अश्याच पद्धतीने एकावेळेला तेलात मावतील इतके ब्रेड चे त्रिकोण तेलात घाला.
- दोन्ही बाजूंना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या व मग एका पेपर टॉवेल वर काढा.
- सर्व ब्रेड चे त्रिकोण अश्याच पद्धतीने तळून घ्या.
- गरम गरम ब्रेड पकोडे आता वाढायला तयार आहेत. वरून आवडत असल्यास थोडासा चाट मसाला ही पसरून मग सर्व्ह करायला हरकत नाही.