- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 40 minutes
डाळ-पालक (पालकाची आमटी) रेसिपी
डाळ-पालक ही खरं तर दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध आमटी आहे. तुरीची डाळ वापरून बनविलेली ही आमटी अतिशय चविष्ट लागते व रोजच्या जेवणात खायला पौष्टिक ही आहे. तुरीच्या डाळी ऐवजी तुम्ही ह्यासाठी मुगाची डाळ ही वापरू शकता, ती ही छान लागते. कोणतीही डाळ वापरली तरी संपूर्ण कृति तीच आहे.
Ingredients
- तुरीची किंवा मुगाची डाळ - १ कप
- पालकाची पाने - १ कप
- लसूण - १ टेबलस्पून, बारीक चिरलेला
- तेल - ४ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कढीपत्ता - ४-५ पानं
- वाळलेल्या लाल मिरच्या - २-३
- टोमॅटो - १, बारीक चिरलेला
- मीठ - स्वादानुसार
Instructions
- डाळ एक दोनदा स्वच्छ धुऊन पाणी काढून टाका.
- मग डाळीत २ कप पाणी घालून प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. तीन शिट्ट्या आल्यावर गॅस बारीक करा व ५ मिनिटांनी बंद करा.
- कुकर गार झाल्यावर डाळ बाहेर काढून चांगली घोटून घ्या.
- पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता व लसूण घालून परतून घ्या.
- त्यातच चिरलेला पालक ही घालून एखादा मिनिट परतून घ्या.
- त्यावर घोटून ठेवलेली डाळ घाला व जरूरीप्रमाणे आणखीन पाणी घाला.
- चवीप्रमाणे मीठ व चिरलेला टोमॅटो घालून सर्व मिसळून घ्या व मग उकळी येऊ द्या.
- उकळी आल्यावर गॅस बंद करा व आवडत असेल तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायला हरकत नाही.
- चविष्ट आणि पौष्टिक डाळ-पालक पोळी किंवा भाताबरोबर गरम गरम वाढा.