- Cook Time: 0day 0 h 45 min
- Serving: ६-७ जणांसाठी
गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी
गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी -
दलिया म्हणजे गव्हाचा बारीक रवा. हा बाजारात सहज मिळतो. भरपूर फायबर असल्यामुळे हा अतिशय पौष्टिक असतो. थंडीच्या दिवसांत दलिया व गुळाची गरम गरम खीर खायला फारच छान लागते. ह्या खिरीची खासियत अशी कि ही दुधाशिवाय किंवा दूध घालून, कशीही खाल्ली तरी छान लागते.
Ingredients
- तूप - १/४ कप
- लवंगा - ४-५
- दलिया (गव्हाचा रवा) - १ कप
- गूळ - १ कप ( अधिक गोड चवीसाठी, १ & १/४ कप)
- ताजं खवलेलं खोबरं - २ टेबलस्पून
- वेलदोड्याची पूड - १/२ टीस्पून
- जायफळाची पूड - १/२ टीस्पून
- बदामाचे काप (ऐच्छिक) - वरून पसरण्यासाठी
Instructions
गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी -
- एका पातेल्यात तूप गरम करून घ्या व त्यात लवंगा घाला.
- त्यावरच दलिया घालून २ मिनिटे चांगले परतून घ्या.
- दलिया किंचित गुलाबी दिसायला लागल्यावर त्यात २ कप पाणी घाला.
- आता दलिया चे भांडे प्रेशर कुकर मधे ठेऊन १ शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्या. एक शिट्टी आल्यावर गॅस ५ मिनिटांसाठी बारीक करा व मग बंद करा.
- कुकर गार झाल्यावर शिजलेला दलिया बाहेर काढा.
- गुळात ३/४ कप पाणी घालून गरम करायला ठेवा.
- गूळ विरघळेपर्यंत हालवत रहा.
- गूळ विरघळल्यावर गॅस बारीक करा.
- त्यात जायफळाची पूड, वेलदोड्याची पूड आणि शिजविलेला दलिया घाला.
- सर्व मिसळून सगळी खीर मिळून आल्यावर गॅस बंद करा.
- वरून थोडे तूप घालून गरम गरम खीर वाढा.
- गार झाल्यावर ही खीर घट्ट होईल. तसे झाल्यास खायला देताना परत त्यात पाणी किंवा गरम दूध (गार दूध घालू नये. गुळामुळे दूध फाटण्याची शक्यता असते) घालून मंद गॅसवर गरम करून घ्या व मग वाढा.
- वाढताना ही खीर सरबरीत असायला हवी.
आशा करते तुम्हाला गव्हाच्या खिरीची हि सोपी व झटपट गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी आवडेल. पुढील लिंकवर ह्याच रेसिपी चा विडिओ English मधे आहे –
ह्या गोड खीरीप्रमाणेच दलिया चा उपमा ही छान लागतो.