- Serving: अंदाजे ११ दिंड्यांसाठी
दिंड रेसिपी
नागपंचमी ला बनवलं जाणारं खास पक्वान्न म्हणजे दिंड. नागपंचमीला भाजायचे, चिरायचे किंवा तळायचे नाही, असा नियम पुष्कळ जण पाळतात. .कदाचित त्यासाठीच ह्या रिसिपीचा जन्म झाला असावा. करायला अगदी सोप्पा आणि खायला अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे. चला मग सुरवात करूया...
Ingredients
- दिंड्याच्या सारणासाठी -
- हरभऱ्याची डाळ - १ कप
- गूळ - १ & १/४ कप
- ताजे खवलेले ओले खोबरे - १/४ कप
- जायफळ पावडर - १/४-१/२ टीस्पून
- वेलदोड्याची पूड - १/४-/२ टीस्पून
- भाजलेली खसखस - १ टीस्पून
- बेदाणे - १०-१२
- दिंड्याच्या कवचासाठी -
- गव्हाची कणीक - १ कप
- तेल - २ टीस्पून
- मीठ - एक चिमूट
Instructions
दिंड्याच्या कवचासाठी -
- कणकेत २ टीस्पून गरम तेल व चिमूटभर मीठ घाला.
- हळू हळू पाणी घालत कणीक पुऱ्यांच्या कणकेसारखी घट्टसर भिजवून घ्या.
- आता सारण तयार होईपर्यंत ही कणीक झाकून ठेवा.
दिंड्याच्या सारणासाठी -
- हरभऱ्याच्या डाळीत २ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये ३ शिट्ट्या होईपर्यंत मऊ शिजवून घ्या.
- शिजविलेल्या डाळीत राहिलेले पाणी कट म्हणून बाजूला काढून ठेवा. (हा कट तुम्हाला कटाच्या आमटी साठी वापरता येईल. बहुतेक आमच्याकडे दिंड व कटाची आमटी-भात असा मेनू असतो..:))
- आता शिजलेल्या डाळीत गूळ मिसळून घ्या व गॅसवर किंवा मायक्रोवेव मध्ये हे सारण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. मधे मधे हालवत रहा.
- सारण हाताने गोळा करता येण्यासारखे घट्ट असे शिजवून घ्या. (पुरण पोळी साठी किंवा कडबुू साठी पुरण शिजवितो तसेच.)
- त्यातच ओले खोबरे, व बेदाणे घालून २ मिनिटे आणखीन शिजू द्या.
- जायफळ पावडर व वेलदोड्याची पूड घालून वरील पुरण चांगले मिसळून घ्या व पूर्ण गार होऊ द्या.
दिंड भरण्याची व त्यापुढील कृति -
- कणकेचे एक ते दीड इंच मोठे भाग करून, हातांमध्ये फिरवून गोल व चपटे करून घ्या.
- एकावेळी एक गोळा घेऊन त्याची गोल पुरी लाटून घ्या.
- पुरीच्या मधोमध थोडे सारण घालून, पुरी चार ही बाजूंनी बंद करा.
- बाकीच्या कणकेची व सारणाची ही अशीच दिंड तयार करून घ्या.
- आता प्रेशर कुकर मध्ये ठेवून दिंड १०-१५ मिनिटांसाठी छान वाफवून घ्या. (वाफ देताना कुकर वर प्रेशर ठेवू नका.)
- किंचित गार झाल्यावर, तूप घालून दिंड खायला द्या.