फोडणीची पोळी रेसिपी
फोडणीची पोळी ही उरलेल्या आदल्या दिवशीच्या पोळीची एक खमंग रेसिपी आहे. याच रेसिपी साठी तुम्ही उरलेला ब्रेड किंवा पाव ही वापरू शकता किंवा उरलेली पोळी व उरलेला ब्रेड असे दोन्ही एकत्र सुद्धा वापरू शकता. सकाळच्या ब्रेकफास्ट साठी करायला ही अगदी सोप्पी व खमंग रेसिपी आहे व उरलेल्या पोळीचा किंवा ब्रेड चा सुद्धा चट्टामट्टा होतो!
Ingredients
- फोडणीच्या पोळीसाठी आदल्या दिवशीची पोळी / उरलेला ब्रेड; फोडणीच्या भातासाठी जास्तीचा भात - फोडणीच्या पोळीसाठी २-३ पोळ्या किंवा ४-५ ब्रेड/पाव; फोडणीच्या भातासाठी १ & १/२ कप भात
- तेल - २ टेबलस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २-३ किंवा चवीनुसार, बारीक किंवा मधून उभ्या उभ्या चिरलेल्या
- कढिलिंब - ५-६ पानं
- शेंगदाणे - २ टेबलस्पून
- कांदा - १ छोटा, बारीक चिरलेला
- मीठ - चवीनुसार
- साखर - १/२ टीस्पून
- लिंबाचा रस (फोडणीच्या भातासाठी ऐच्छिक) - १ टीस्पून
- बारीक शेव - फोडणीच्या पोळीवर पसरायला
- बारीक चिरलेली कोथिंबीर - आवडीप्रमाणे, वरून पसरायला
Instructions
- पोळी किंवा ब्रेड चे हाताने मोठे मोठे तुकडे करून घ्या.
- मग मिक्सर मधे त्याचा किंचित भरड असा एकसारखा चुरा करून घ्या. (हाताने कुस्करून ही चुरा करता येऊ शकतो.)
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढिलिंब व मिरच्या घाला.
- त्यावरच दाणे घाला व एखादा मिनिट दाणे तेलावर परतून घ्या.
- आता कांदा घालून कांदा ही किंचित ब्राउन दिसेपर्यंत परतून घ्या.
- आता कुस्करलेली पोळी/ब्रेड घाला व सगळे मिसळून घ्या व गॅस बारीक करा.
- चवीनुसार, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून परत मिसळून घ्या.
- बारीक गॅसवर, मधे मधे हालवत, २ मिनिटे आणखीन परतून घ्या.
- गॅस बंद करून फोडणीची पोळी वाढा. वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा शेव किंवा दोन्ही पसरून घाला.