- Prep Time: 30 minutes
- Cook Time: 10 minutes
- Serving: ३ जणांसाठी
स्प्रिंग डोसा रेसिपी
स्प्रिंग डोसा हा एक डोस्याचा पौष्टिक आणि चविष्ट प्रकार आहे. ह्या डोस्याच्या मसल्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या व आपल्या आवडीच्या भाज्या वापरू शकता. इथे मी डोस्याच्या पिठाची व बटाटा-कांदा मसाल्याची रेसिपी दिलेली नाही. ती तुम्ही पुढील मसाला डोस्याच्या लिंक वर पाहू शकता - https://goo.gl/MpcNtA
Ingredients
- डोस्याचे पीठ - साधारण १ कप
- बटाटा व कांद्याचा मसाला - ३/४ कप
- किसलेली गाजरं - १/४ कप
- डब्बू मिर्ची - १/४ कप बारीक चिरलेली
- फ्लॉवर - १/४ कप अगदी बारीक चिरलेला
- पातीचा कांदा - १/४ कप बारीक चिरलेला
- तेल - आवश्यकतेनुसार
- सांभार मसाला - १ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
Instructions
फिलिंग साठी :
- मसाला डोस्याला लागणारा बटाटा-कांदा मसाला, दोन छोटे बटाटे व अर्धा कांदा वापरून तयार करून घ्या.
- एका कढईत २-३ टीस्पून तेल घालून त्यात गाजरं, डब्बू मिर्ची, फ्लॉवर, व पातीचा कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्या.
- त्यात सांभार मसाला व चवीप्रमाणे मीठ घाला.
- त्यातच बटाटा-कांदा मसाला ही घालून सर्व मिसळून घ्या.
- एखादा मिनिट सगळे परतून गॅस बंद करून टाका.
डोस्यासाठी :
- डोस्याचे पीठ तयार करून घ्या.
- तवा मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
- तव्याच्या मधोमध अंदाजे ३ टेबलस्पून डोस्याचे पीठ घालून एका पळीने किंवा चमच्याच्या मागील बाजूने गोल पातळ डोसा पसरून घ्या.
- डोस्याच्या कडेने व मध्ये साधारण १ टीस्पून तेल पसरून घ्या.
- डोसा खालच्या बाजूने किंचित गुलाबी दिसेपर्यंत वाट पहा.
- मग डोस्याच्या मधे ३-४ टेबलस्पून फिलिंग ठेऊन डोसा दोन्ही बाजूने फिलिंग भोवती घट्ट गुंडाळा व अर्धा कापून घ्या.
- गरम गरम स्प्रिंग डोसा चटणी व सांभार बरोबर वाढा.