- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
- Serving: अंदाजे ५ जणांसाठी
अडई रेसिपी
अडई ही साऊथ इंडियातील एक अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. अनेक प्रकारच्या डाळी व उसळी वापरून ही रेसिपी तयार केली जाते त्यामुळे ही भरपूर प्रोटीन्स असलेली एक पौष्टिक रेसिपी आहे. त्यात तुम्ही आवडीप्रमाणे थोडा फार फेरबदल ही करू शकता. शिवाय आवडीच्या काही भाज्या जसे किसलेले गाजर, बारीक चिरून मेथीची पानं, पालकाची पानं, पत्ता गोभी, किसलेला दुधीभोपळा वगैरे ही घालून आणखीन पौष्टिक बनवू शकता.
Ingredients
- तांदूळ - १ कप
- उडदाची डाळ - १/२ कप
- मुगाची डाळ - १/२ कप
- हरभऱ्याची डाळ - १/२ कप
- चवळी - १ टेबलस्पून
- हिरवे मूग - १ टेबलस्पून
- मसूर - १ टेबलस्पून
- छोले किंवा काबुली चना - १ टेबलस्पून
- हरभरे - १ टेबलस्पून
- राजमा, मटकी किंवा पांढरे वाटणे; यांपैकी कोणतेही एक - १ टेबलस्पून
- आलं - २ इंच मोठा तुकडा
- लसूण - ४-५ मोठ्या पाकळ्या
- हिरव्या मिरच्या - ३-४ किंवा चवीप्रमाणे
- बारीक चिरलेला कांदा - १
- बारीक चिरलेली कोथिंबीर - १/४ कप
- तेल - आवश्यकतेनुसार
Instructions
- तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, चवळी, मूग, मसूर, काबुली चना, हरभरे, राजमा (किंवा मटकी किंवा पांढरे वाटणे) सर्व एकत्र करून धुऊन घ्यावेत व ४ तास भरपूर पाण्यात भिजत घालावेत.
- भिजल्यानंतर त्यावरील पाणी थोड्यावेळ बाजूला काढून ठेवावे.
- एका मिक्सरच्या भांड्यात आलं, मिरच्या, लसूण व भिजत घातलेली सर्व सामग्री घालून किंचित भरड असे वाटून घ्यावे. वाटताना बाजूला काढून ठेवलेले पाणी आवश्यकतेनुसार वापरावे व डोस्याच्या पिठाप्रमाणे किंचित दाटसर पीठ तयार करून घ्यावे.
- त्यात कांदा, कोथिंबीर व मीठ घालून सर्व मिसळून घ्यावे.
- आता एका गरम तव्याच्या मधोमध अंदाजे ३-४ टेबलस्पून पीठ घालावे व गोलसर पसरावे. डोस्याप्रमाणे पातळ न पसरता १/२ से.मी. जाडच पसरावे.
- त्याच्या कडेने थोडे तेल सोडून त्यावर झाकण ठेवावे व २ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
- वरील बाजू शिजल्यासारखी दिसायला लागल्यावर दुसऱ्या बाजूला उलटून टाकावे.
- दुसऱ्या बाजूला ही थोडे डाग आल्यावर तव्यावरून काढून घ्यावे व गरम गरम अडई कोणत्याही आवडीच्या चटणीबरोबर वाढावे.