Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About
  • English
  • हिन्दी

फोडणीची पोळी रेसिपी

फोडणीची पोळी रेसिपी
  • Prep Time: 5 minutes
  • Cook Time: 10 minutes
  • Serving: दोघांसाठी
Print

फोडणीची पोळी रेसिपी

By Uma Abhyankar मार्च 27, 2021

फोडणीची पोळी ही उरलेल्या आदल्या दिवशीच्या पोळीची एक खमंग रेसिपी आहे. याच रेसिपी साठी तुम्ही उरलेला ब्रेड किंवा पाव ही वापरू शकता किंवा उरलेली पोळी व उरलेला ब्रेड असे दोन्ही एकत्र सुद्धा वापरू शकता. सकाळच्या ब्रेकफास्ट साठी करायला ही अगदी सोप्पी व खमंग रेसिपी आहे व उरलेल्या पोळीचा किंवा ब्रेड चा सुद्धा चट्टामट्टा होतो!

Ingredients

  • फोडणीच्या पोळीसाठी आदल्या दिवशीची पोळी / उरलेला ब्रेड; फोडणीच्या भातासाठी जास्तीचा भात - फोडणीच्या पोळीसाठी २-३ पोळ्या किंवा ४-५ ब्रेड/पाव; फोडणीच्या भातासाठी १ & १/२ कप भात
  • तेल - २ टेबलस्पून
  • मोहरी - १ टीस्पून
  • हिंग - १/४ टीस्पून
  • हळद - १/२ टीस्पून
  • हिरव्या मिरच्या - २-३ किंवा चवीनुसार, बारीक किंवा मधून उभ्या उभ्या चिरलेल्या
  • कढिलिंब - ५-६ पानं
  • शेंगदाणे - २ टेबलस्पून
  • कांदा - १ छोटा, बारीक चिरलेला
  • मीठ - चवीनुसार
  • साखर - १/२ टीस्पून
  • लिंबाचा रस (फोडणीच्या भातासाठी ऐच्छिक) - १ टीस्पून
  • बारीक शेव - फोडणीच्या पोळीवर पसरायला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - आवडीप्रमाणे, वरून पसरायला

Instructions

  1. पोळी किंवा ब्रेड चे हाताने मोठे मोठे तुकडे करून घ्या.
  2. मग मिक्सर मधे त्याचा किंचित भरड असा एकसारखा चुरा करून घ्या. (हाताने कुस्करून ही चुरा करता येऊ शकतो.)
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
  4. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढिलिंब व मिरच्या घाला.
  5. त्यावरच दाणे घाला व एखादा मिनिट दाणे तेलावर परतून घ्या.
  6. आता कांदा घालून कांदा ही किंचित ब्राउन दिसेपर्यंत परतून घ्या.
  7. आता कुस्करलेली पोळी/ब्रेड घाला व सगळे मिसळून घ्या व गॅस बारीक करा.
  8. चवीनुसार, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून परत मिसळून घ्या.
  9. बारीक गॅसवर, मधे मधे हालवत, २ मिनिटे आणखीन परतून घ्या.
  10. गॅस बंद करून फोडणीची पोळी वाढा. वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा शेव किंवा दोन्ही पसरून घाला.

 

  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

kadbu
View Recipe

कडबू रेसिपी

30 min
पाकतल्या पुऱ्या रेसिपी
View Recipe

पाकतल्या पुऱ्या

30 min
गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी
View Recipe

गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी

30 min

Post navigation

← राजमा रेसिपी
कढी रेसिपी →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.