गाजराची चटणी रेसिपी
गाजराची चटणी - करायला अगदी सोपी आणि अतिशय चविष्ट. कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थांबरोबर झटपट करायला व खायला अगदी योग्य. जरूर करून पहा!
Ingredients
- गाजर - १ मोठं, बारीक तुकडे केलेलं
- तीळ - १ टीस्पून
- किसलेले खोबरे - १ टीस्पून
- दाण्याचं कूट - १ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- वाळलेली चिंच - १ इंच मोठा तुकडा
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- गूळ - १ & १/२ टीस्पून
- तेल - १ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- मेथी दाणे - १/४ टीस्पून
- वाळलेली लाल मिर्ची - १
- कढिलिंब - ४-५ पानं
Instructions
- गाजराचे तुकडे, तीळ, किसलेले खोबरे, दाण्याचे कूट, चिंच, गूळ, मीठ, लाल तिखट, सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्यावी. वाटताना लागेल तसे पाणी ही घालावे.
- तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, मेथी दाणे, लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने घालावीत.
- कढीलिंबाची पाने तडतडेपर्यंत एखादा मिनिट परतावे.
- वरील फोडणी किंचित गार झाल्यावर कृतीक्रमांक १ मधील पेस्ट वर घालावी.
- गाजराची ही तयार चटणी धिरडे, रवा डोसा, अडई सारख्या पदार्थांबरोबर किंव रोजच्या जेवणात केंव्हाही वाढावी.
इतर काही चटण्या – ह्या ही जरूर करून पहा —
४. कैरीची चटणी
६. जवसाची चटणी