
- Cook Time: १०-१५ minutes
झटपट गोड चटणी रेसिपी
चिंच गुळाची गोड चटणी, जी आपण भेळेवर किंवा इतर चाट पदार्थांवर घेतो, ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तीच चटणी झटपट तयार करायची ही रेसिपी आहे. मात्र ह्या चटणीत चिंच पूर्ण पणे वगळली आहे. दिसायला व चवीला ही झटपट चटणी अगदी चिंच गुळाच्या चटणी सारखीच आहे - इतकी की तुम्हाला फरक सांगता येणार नाही!
Ingredients
- आमचूर - १/४ कप
- साखर - ३/४ कप
- जिऱ्याची पूड - १ टीस्पून
- लाल तिखट - चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- गरम मसाला/चाट मसाला/सुंठ पावडर - १ टीस्पून
Instructions
- सर्व सामग्री एकत्र करून त्यात १/२ कप पाणी घाला व मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करून घ्या.
- वरील पेस्ट मधे आणखीन १/२ ते १ कप पाणी घालून उकळायला ठेवा.
- मधे मधे हालवत रहा व उकळी आल्यावर तसेच पुढे उकळत ठेवा.
- चटणी ला चिंच- गुळाच्या चटणी प्रमाणे दाटपणा आला की गॅस बंद करून टाका. (लक्षात असून द्या की गार झाल्यावर चटणी अधिक दाट होईल.)
- तयार चटणी पूर्ण गार झाल्यावर बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेऊन द्या.